Sindhudurg: मालवणात २४ मार्चपासून महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन

0
59
मालवणात २४ मार्चपासून महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन
मालवणात २४ मार्चपासून महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन

मालवण : मालवणात २४,ते २७ मार्चपर्यंत ४ दिवस महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मालवण येतील जेटी बंदर येथे हे प्रदर्शन भरणार आहे अशी माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन २४ मार्च रोजी उपरी १ वाजता सा.बा.विभाग अन्न नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री व पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांच्या माध्यमातून बनविलेले उत्पादन विक्री करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मत्स्यव्यवसाय-क्षेत्र/

जिल्हाकार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब,गरजू,विधवा,परितक्त्या भूमिहीन महिला ,अल्पभूधारक महिला,विधवा महिला यांच्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केले जात आहे.सिंधुदुर्गात माविम अंतर्गत ग्रामीण भागात १३६ गावात १ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून ११०५७ महिला तसेच शहरी भागातील ५८ गावात २७५ गटांच्या माध्यमातून एकूण २८४९ महिला असे एकूण १३९१६ महिलांचे संघटन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here